भारतात ₹३५०० बिलियन इन्व्हेस्टमेंट, हा आहे TATA कंपनीचा प्लॅन

भारतात ₹३५०० बिलियन इन्व्हेस्टमेंट, हा आहे TATA कंपनीचा प्लॅन

जगातील टॉप दहा ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये स्थान मिळवलेल्या आणि $५१ बिलियन मार्केट व्हॅल्युएशनसह Tata Motors ने $४१ बिलियन म्हणजेच ₹३५०० बिलियन ची मोठी गुंतवणूक करत भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासातील सर्वात मोठी प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी सुरू केली आहे. २०३० पर्यंत जवळपास तीस नवीन व्हेईकल्स लॉन्च करण्याचा टार्गेट आहे, ज्यात सात पूर्णपणे नवीन मॉडेल्स असतील. यामध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल दोन्ही प्रकारातील वर्चस्व अधिक घट्ट होणार आहे.

Tata Motors News in Marathi
Tata Motors News in Marathi

EV गाड्यांवर अधिक भर

Gen-२ आणि Gen-३ EV प्लॅटफॉर्मवर आधारित दहा हून अधिक इलेक्ट्रिक व्हेईकल्स २०३० पर्यंत लॉन्च होतील. TATA Motors कंपनीचा उद्देश आहे EV मार्केटमध्ये वीस टक्के शेअर मिळवणे. काही महत्त्वाचे EV लॉन्चेस आहेत:

  • Sierra EV (सप्टेंबर २०२५): ₹२५–३० लाख किंमतीत, रेट्रो SUV, ५०० किलोमीटर रेंज, बटरफ्लाय डोअर्स.
  • Safari EV (मे २०२६): ₹२६–३२ लाख किंमत, ARAI-मान्य ३००+ किलोमीटर रेंज, फॅमिली SUV.
  • Altroz EV (जानेवारी २०२७): ₹१२–१५ लाख, ३०६ किमी रेंज, Ziptron टेक वापरून बनवलेली प्रीमियम हॅचबॅक.
  • Curvv EV आणि Harrier EV: हे आधीच प्रॉडक्शनमध्ये आहेत.

ICE आणि Hybrid गाड्यांचा देखील लाँच होणार आहे

EVs महत्त्वाच्या असल्या तरी पेट्रोल-डिझेल (ICE) गाड्यांचं योगदान अद्याप महत्त्वाचं आहे. अशाच काही गाड्या टाटा लाँच करणार आहे जसे कि:

  • Sierra ICE (ऑक्टोबर २०२५): ₹१०.५ लाख किंमत, नवीन १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (१६८PS/२८०Nm).
  • Harrier/Safari Petrol (२०२५): डिझेलचे पर्याय – यावर्षी लॉन्च.
  • Punch Facelift (नोव्हेंबर २०२५): ₹६–११ लाख किंमत, नवीन डिझाईन आणि फीचर्स.
  • Next-Gen Nexon (२०२६): १.२ पेट्रोल / १.५ डिझेल इंजिन कायम, पण ADAS, प्रीमियम साउंड आणि Curvv-प्रेरित डिझाईनसह.

Hybrid गाड्या डेव्हलपमेंटमध्ये आहेत, पण त्यांची लॉन्च गव्हर्नमेंट इन्सेन्टिव्ह आणि EV इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून आहे.

Avinya टाटाची प्रीमियम EV थोडी उशिरा लाँच होतेय

मुळात २०२५ साठी प्लॅन केलेली Avinya आता २०२७ मध्ये लॉन्च होणार आहे. कारण Jaguar Land Rover चा EMA प्लॅटफॉर्म भारतात लोकेलायझ करण्यासाठी जरा उशीर झाला आहे. ही “Born-Electric” गाडी ₹३५–६० लाख किंमतीत येईल.

मुख्य वैशिष्ट्ये:

  • Screenless केबिन: व्हॉइस कंट्रोल्स, अरोमा, आणि सस्टेनेबल मटेरियल्स.
  • Fast Charging: ३० मिनिटांत ५०० किमी रेंज, फ्लॅट फ्लोअर आर्किटेक्चर.
  • Avinya X कॉन्सेप्ट: P1 ते P5 मॉडेल्स सादर करतील.

Tata ची Market स्ट्रॅटेजी – 3Es, Solar EVs आणि चार्जिंग नेटवर्क

3Es स्ट्रॅटेजी – Expansion, EV Ecosystem, EV Channel

  • Charging Infrastructure: Tata Power, ChargeZone, Shell सोबत पार्टनरशिप; २०२७ पर्यंत ५०+ शहरांमध्ये फक्त EV साठी डीलरशिप.
  • Solar-EV Integration: EV यूझर्सपैकी ५०% घरांमध्ये Rooftop Solar बसवण्याचा टार्गेट.
  • Portfolio Division: Passenger EVs + JLR वेगळं आणि Commercial व्हेईकल्स वेगळं, जेणेकरून फोकस अधिक स्पष्ट आणि Maruti Suzuki ला टक्कर देता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *