सुमोची दुसरी इनिंग! 2025 Tata Sumo ची माहिती व संभाव्य किंमत

सुमोची दुसरी इनिंग! 2025 Tata Sumo ची माहिती व संभाव्य किंमत

टाटा सुमो ही गाडी भारताच्या SUV इतिहासातील एक अवीस्मरणीय गाडी आहे. पण काही दशकानंतर, आता ही आयकॉनिक गाडी पुन्हा एकदा बाजारात येण्याच्या तयारीत आहे. Tata Sumo 2025 म्हणजे केवळ जुनी आठवण नाही, तर नव्या SUV युगासाठी नव्याने तयार केलेली एक अफलातून गाडी आहे. अधिकृत माहितीनुसार आणि विश्वासार्ह रिपोर्ट्सवर आधारित माहिती खाली दिली आहे.

2025 Tata Sumo कन्फर्म अशे फीचर्स

टाटा सुमोच्या नव्या मॉडेल मध्ये संतुलित कामगिरीवर भर देण्यात आली आहे. इथे तुम्हाला मिळते:

  • २.० लिटर (१,९९९ सीसी) पेट्रोल इंजिन, मॅन्युअल ट्रान्समिशनसह.
  • पारंपरिक बॉडी-ऑन-फ्रेम संरचना, जुन्या सुमोचा रांगडेपणा कायम.
  • ४x४ क्षमता : प्रॉडक्शन मॉडेलमध्ये अपेक्षित, तिच्या ऑफ-रोड परंपरेशी सुसंगत.

काही रिपोर्ट्स डिझेल इंजिन किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे संकेत देतात, परंतु याची अधिकृत पुष्टी नाही. नवीन उत्सर्जन नियमांमुळे टाटा पेट्रोलवरच भर देणार आहे.

डिझाईन आणि महत्त्वाचे फिचर्स

टाटा सुमो २०२५ हे एक जुनं आकर्षण आणि आधुनिक टच असलेली SUV असणार आहे. इथे तुम्हाला बॉक्सि, दमदार आणि मजबूत बॉडी, आधुनिक एलईडी लाईट व नवीन मजबूत ग्रिल मिळणार आहे.

इंटेरियर मध्ये प्रशस्त ७ सीट लेआउट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जर तुम्ही टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी बद्दल विचाराल तर यात तूम्हाला ३६०° कॅमेरा, एबीएस, कनेक्टेड कार टेक यांसारखी वैशिष्ट्ये अपेक्षित आहेत मात्र ADAS अजूनही अनिश्चित.

बाबपुष्टी झालेले वैशिष्ट्यअफवांमध्ये येणारे वैशिष्ट्य
इंजिन२.० लिटर पेट्रोलडिझेल / CNG व्हेरिएंट्स
ट्रान्समिशनमॅन्युअलऑटोमॅटिक
ड्राईव्हट्रेनRWD (४x४ पर्यायात)फुल-टाइम AWD
सनरूफउपलब्ध नाहीपॅनोरॅमिक (अधिकृत नाही)

2025 Tata Sumo ची किंमत काय असेल?

मित्रानो किंमत अद्याप अधिकृतपणे जाहीर नाही केला, पण बऱ्याच चर्चांमध्ये उलटसुलट अंदाज मांडले आहेत:

  • सोशल मीडियावरील दावे : ₹५.९९ लाख ते ₹१५ लाख ज्याची विश्वासार्हता नाही.
  • जुनं सुमो गोल्ड (२०१२–२०१९) ₹५.२६ लाख ते ₹८.९३ लाख दरम्यान विकली जात होती. मात्र २०२५ मॉडेलमध्ये सुधारित वैशिष्ट्यांमुळे किंमत जास्त असण्याची शक्यता.
  • ऑटो इंडस्ट्री विश्लेषक ₹१०–१५ लाख दरम्यान किंमत असण्याचा अंदाज वर्तवतात, महिंद्र बोलेरो निओ आणि स्कॉर्पिओ क्लासिकशी थेट स्पर्धा असेल.

2025 Tata Sumo कंपेटिटर कोण आहेत?

टाटा सुमो २०२५ अशा सेगमेंटमध्ये येत आहे जे आधीच खूप स्पर्धात्मक आहे. जिथे स्पर्धा थेट महिंद्र बोलेरो, स्कॉर्पिओ क्लासिक आणि वापरलेल्या SUV गाड्या सोबत होणार आहे. मात्र टाटा ब्रँडवर असलेला विश्वास, कमी मेंटेनन्स खर्च आणि दमदार ऑफ-रोड क्षमता २०२५ टाटा सुमो ला एक दमदार गाडी बनवतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *