Mahindra Vision.T Concept & the Thar EV Teaser Ahead of August 15 Debut

Mahindra & Mahindra पुन्हा एकदा इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी नुकतेच एक क्रिप्टिक टीझर रिलीज करून Vision.T नावाचा नवा SUV कॉन्सेप्ट प्रदर्शित केला आहे. हाच कॉन्सेप्ट १५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत होणाऱ्या Freedom_NU इव्हेंटमध्ये अनव्हील होणार आहे. हाच दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन असल्याने “Freedom” ही थीम अधिक प्रतीकात्मक बनते. या दिवशी महिंद्राचा Freedom NU प्लॅटफॉर्म देखील लॉन्च केला जाईल, जो ICE (petrol/diesel), hybrid आणि EV अशा सर्व पॉवरट्रेन्ससाठी डिझाइन केलेला आहे.
Vision.T च्या डिझाईनवर नजर टाकल्यास, ही SUV थेट थारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनसारखी दिसते. फ्लेअर्ड व्हिल आर्चेस, मोठा स्क्वेअर बोनट, ऑल-टेरेन टायर्स, उघड्या हूड लॅचेस आणि एक दमदार बम्पर. या सर्व घटकांमुळे हा थारचा डीएनए असलेला प्रॉडक्ट वाटतो.
टीझरमध्ये दाखवलेली upright बॉक्सी प्रोफाइल ही २०२३ मध्ये साउथ आफ्रिकेत सादर करण्यात आलेल्या Thar.e कॉन्सेप्टची आठवण करून देते. याशिवाय, पाच दरवाज्यांची कन्फिगरेशन Vision.T मध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे, जे ग्राहकांना अधिक प्रॅक्टिकॅल युटिलिटी देईल. सध्या तीन दरवाज्यांची थार जास्त अॅडव्हेंचर ओरिएंटेड आहे, पण Vision.T फॅमिली SUV म्हणूनही काम करू शकेल.
टेक फीचर्सच्या बाजूंनी बोलायचं झाल्यास, Vision.T ही SUV Freedom NU architecture किंवा INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. ह्या मॉड्युलर प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे यावर पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि फुली इलेक्ट्रिक मॉडेल्स तयार करता येतील. महिंद्राने त्यांच्या चाकण प्लांटमध्ये सुसज्ज EV मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं आहे, जिथे दरवर्षी सुमारे एक लाख वीस हजार युनिट्स तयार होतील.
या SUV मध्ये dual-motor all-wheel drive (AWD) सिस्टम, ६० ते ८० kWh बॅटरी पॅक, ४०० ते ५०० किलोमीटर रेंज, आणि २५०–३०० मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळण्याची शक्यता आहे. या गोष्टी Vision.T ला खऱ्या अर्थाने ऑफ-रोड EV बनवतील.
Vision.T ही थार EV असण्याची शक्यता प्रबळ असली, तरी काही जणांनी अंदाज लावला आहे की हा Scorpio EV सुद्धा असू शकतो. मात्र, Mahindra ने वेगळा Vision.S कॉन्सेप्ट आधीच टीझ केला आहे, जो Scorpio EV चं प्रिव्ह्यू दर्शवतो. त्यामध्ये Scorpio चा आयकॉनिक ग्रिल आणि बॉक्सी लूक स्पष्ट आहे. याशिवाय, Vision SXT नावाचं आणखी एक कॉन्सेप्ट Scorpio वर आधारित इलेक्ट्रिक पिकअप असणार आहे. यात क्लॅमशेल बोनट आणि विन्चसाठी तयार बम्पर पाहायला मिळतो.
Freedom_NU इव्हेंटमध्ये महिंद्राकडून एकूण चार नवे कॉन्सेप्ट व्हेईकल्स सादर होणार आहेत – Vision.T (Thar EV), Vision.S (Scorpio EV), Vision SXT (Scorpio-based pickup EV), आणि एक Mystery Concept ज्याचं टीझर ग्रे रंगात दाखवण्यात आलं आहे आणि त्याची माहिती अजून गुप्त ठेवण्यात आली आहे.
या सगळ्या संकल्पनांमधून महिंद्राचं EV क्षेत्रातील मोठं स्वप्न स्पष्ट होतं ते म्हणजे ग्लोबल लेव्हलवर EV SUV आणि पिकअप ट्रक्स बनवण्याचं. यामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिका यांसारख्या बाजारपेठा लक्षात घेऊन त्यांचं डिझाईन आणि टफनेस तयार करण्यात येतोय. Mahindra चं लक्ष हे मॉड्युलर डिझाईन आणि कस्टमायजेबिलिटी यावरही आहे म्हणजेच ग्राहक बंपर्स, लाइट्स, इंटेरियर्स यासारख्या गोष्टी आपल्या आवडीनुसार बदलू शकतील.
Vision.T चा उत्पादन मॉडेल म्हणजे थार EV याचा अधिकृत लॉन्च २०२६ मध्ये अपेक्षित आहे. याची अंदाजे किंमत ₹२० ते ₹२५ लाखांच्या दरम्यान असेल. हिचा थेट मुकाबला Tata Harrier EV, XUV 3XO EV, आणि Mahindra XEV 9e सारख्या SUV सोबत होईल. फीचर्सच्या बाबतीत ही SUV Level-2 ADAS, connected tech, panoramic sunroof, आणि ड्युअल स्क्रीन इंटरफेस यांसारख्या अत्याधुनिक गोष्टी घेऊन येण्याची शक्यता आहे.
संपूर्ण Vision.T ही एक EV SUV असली, तरी तिचं वैशिष्ट्य हे आहे की ती एका अॅडव्हेंचर SUV चं इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मेशन आहे जी शून्य उत्सर्जनावर चालते आणि पारंपरिक थारप्रमाणे रग्ड, ऑफ-रोड क्षमतांनी भरलेली असेल.