Toyota मिनी Fortuner म्हणजेच Land Cruiser FJ लवकरच मार्केटमध्ये येणार

टोयोटा आता लवकरच आपली एक अफोर्डेबल आणि दमदार SUV – Toyota Land Cruiser FJ (लोकप्रिय नावाने ‘Mini Fortuner’) – लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही SUV एप्रिल ते जून २०२६ या दरम्यान जागतिक स्तरावर पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही SUV कंपनीच्या ऑफ-रोड पोर्टफोलिओत एक बजेट-फ्रेंडली आणि रेट्रो-स्टाईल पर्याय म्हणून येत आहे.

FJ ही SUV IMV 0 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे – हाच तो ladder-frame architecture आहे जो सध्या Hilux Champ मध्ये वापरला जातो. ही बॉडी-ऑन-फ्रेम SUV ला मजबूत आणि खडतर रस्त्यांसाठी तयार बनवते.

याचा बॉक्सी सिल्हुएट, स्क्वेअर व्हील आर्चेस, फ्लॅट रूफलाइन, उभ्या बॉडी पॅनल्स, आणि C-शेप LED DRLs हे सगळे डिझाईन एलिमेंट्स Land Cruiser च्या हेरिटेजला उजाळा देतात. मागच्या बाजूला टेल लॅम्प्सही बॉक्सी आणि रांगडं लूक देतात.

इंजिन ऑप्शन्स – डिझेल, पेट्रोल, आणि शक्यतो EV

Toyota ने अजूनपर्यंत इंजिन डिटेल्स जाहीर केले नाहीत, पण रिपोर्टनुसार खालील इंजिन्सचा पर्याय असू शकतो:

  • १.५-लिटर डिझेल इंजिन (बेस वर्जनसाठी)
  • २.८-लिटर GD सिरीज ४८V माइल्ड-हायब्रिड डिझेल, जे फॉर्च्युनर आणि हिलक्समध्ये वापरले जाते
  • २.० लिटर आणि २.७ लिटर पेट्रोल इंजिन्स देखील विचाराधीन, यातील २.७ लिटर 2TR-FE इंजिन (१६३ PS पॉवर) सर्वात प्रमुख मानले जात आहे.
  • SUV मध्ये फुल-टाइम 4WD सिस्टम, Torsen लिमिटेड-स्लिप डिफरेंशियल, आणि मल्टी टेरेन ड्राइव्ह मोड्स असण्याची शक्यता आहे.

सध्या EV व्हर्जनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, पण Toyota च्या दीर्घकालीन EV प्लॅननुसार भविष्यात बॅटरी-इलेक्ट्रिक वर्जन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय बाजारात येणार का?

Land Cruiser FJ ही SUV Fortuner पेक्षा किंमतीत आणि आकाराने खाली असेल. त्यामुळे ती दक्षिण आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका अशा मार्केटसाठी योग्य मानली जाते. सध्या भारतात तिच्या लॉन्चबाबत कोणतीही पुष्टी नाही, पण जर Toyota ला कमी किंमतीत ही SUV सादर करायची असेल तर भारतात असेंब्ली शक्य आहे.

Hilux Champ सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यामुळे Toyota या SUV चा उत्पादन खर्च कमी करू शकते, जे भारतासारख्या देशात फायदेशीर ठरेल.

अपेक्षित फीचर्स काय आहेत?

  • C-शेप LED DRLs व प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
  • रांगडे, रेट्रो बॉक्सी डिझाईन
  • फुल-टाइम 4WD व ऑफ-रोड मोड्स
  • रूफ रेल्स, मोठे व्हील आर्चेस, आणि जास्त ग्राउंड क्लीयरन्स
  • ८ ते १० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम
  • ADAS फीचर्स (टॉप व्हेरियंटमध्ये शक्यता)
  • ५ किंवा ७ सीटर कॉन्फिगरेशन (मार्केटनुसार)

स्पर्धक कोण?

ही SUV ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी एक किफायतशीर पर्याय ठरू शकते. संभाव्य स्पर्धक म्हणजे:

  • Maruti Suzuki Jimny ५-डोअर
  • Mahindra Thar आणि Scorpio-N
  • Force Gurkha ५-डोअर (अपकमिंग)
  • Mitsubishi Pajero री-एंट्री झाली तर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *