Triumph Motorcycles ने आपली लोकप्रिय middleweight naked bike – Trident 660 भारतात २०२५ साठी अपडेट करून लाँच केली आहे. ₹८.४९ लाख (ex-showroom) किंमतीपासून सुरू होणारी ही बाईक आता अधिक स्मार्ट, tech-packed आणि ride-friendly झाली आहे. यामध्ये नव्याने cruise control, riding modes आणि connectivity फीचर्ससह अनेक अपडेट्स मिळतात, पण त्याचा दमदार triple-cylinder engine मात्र तोच ठेवण्यात आला आहे.




२०२५ Trident 660 मध्ये काय आहे नवीन?
Triumph ने यंदा Trident 660 मध्ये cosmetic बदल न करता real-world upgrades दिले आहेत. ही बाईक आता अधिक refined, comfortable आणि tech-savvy झाली आहे.
नवीन स्टँडर्ड फीचर्स:
- Cruise Control – आता long rides दरम्यान स्थिर स्पीड राखणे सोपं.
- Quickshifter Support – gear बदलायला आता clutch ची गरज नाही (optional accessory).
- Rain Ride Mode – Road आणि Sport modes व्यतिरिक्त आता पावसात उपयोगी असा नवीन ride mode.
TFT-Integrated LCD Display – Triumph च्या optional My Triumph connectivity module ला सपोर्ट, ज्यामुळे turn-by-turn navigation, phone/media control, आणि GoPro access शक्य होतं.
Chassis आणि Handling कशी आहे ?
Trident 660 चं tubular steel perimeter frame हे Showa च्या ४१ मिमी USD SFF-BP forks (120 mm travel) आणि rear adjustable monoshock (130 mm travel) वर बसलेलं आहे. या suspension सेटअप मुळे बाईक city मधून सहज फिरते आणि weekend rides साठीही confident feel देते.
१९० किलो weight (wet) आणि ८०५ मिमी seat height मुळे ही बाईक accessible वाटते. १४ लिटरचं fuel tank, २४.६° rake आणि १४०१ मिमी wheelbase यामुळे ride agile आणि balanced होते.
Braking, Safety आणि Grip कशी आहे?
ब्रेकिंग सेगमेंटमध्ये:
- 310 mm dual front discs with Nissin 2-piston calipers
- 255 mm rear disc
- Optimised Cornering ABS
- Tyres – Michelin Road 5 (120/70 R17 front आणि 180/55 R17 rear) – यामुळे wet आणि dry दोन्ही परिस्थितीत भारी grip मिळतो.
Connectivity आणि Customization Options
TFT स्क्रीनमध्ये आता Triumph चं optional My Triumph connectivity module सपोर्ट करतं, ज्यामुळे:
- Turn-by-turn navigation
- Phone/media control
- GoPro operation
Optional Accessories:
- Heated grips
- USB charger
- LED scrolling indicators
- Tyre Pressure Monitoring System (TPMS)
- Tail packs, tank bags
- Bar-end mirrors, flyscreen, belly pan
Trident 660 ला १६,००० किमी किंवा १२ महिन्यांचं service interval आहे जे या सेगमेंटमध्ये खूप competitive आहे. Triumph India कडून service packages आणि extended warranty सुद्धा मिळते.
कॉम्पिटीशन – कोण आहेत राइव्हल्स?
Trident 660 ची टक्कर खालील bikes बरोबर आहे:
- Kawasaki Z650 – कमी किमतीत twin-engine, पण triple-cylinder नाही
- Honda CB650R – महाग आणि slightly powerful
- Yamaha MT-07 – भारतीय बाजारात अजून उपलब्ध नाही
Trident 660 ही performance, tech, आणि exclusivity याचं ultimate blend देते.