सर्वात स्वस्त ४x४ गाड्या
हिमालयातील रौद्र घाटवाटा, कोकणातील पावसाळी कच्चे रस्ते, वाळवंटातील वाळवाट – अशा भारतातील विविध भूमीवर फिरण्याचं स्वप्न बाळगणारे अनेक जण आपल्या गाडीकडून “४x४” क्षमतेची अपेक्षा करतात. पण एक मोठा प्रश्न नेहमी पडतो – ₹१० लाखांच्या आत नवीन ४x४ गाडी खरेदी करता येईल का?
वास्तविक परिस्थिती – ₹१० लाखांच्या आत एकही नवीन ४x४ गाडी उपलब्ध नाही!
२०२५ च्या मध्यात बाजारामध्ये ₹१० लाखांखाली कोणतीही ब्रँड-न्यू ४x४ गाडी भारतात उपलब्ध नाही. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. जस कि सर्वप्रथम, अभियांत्रिकी खर्च हे एक मोठं कारण आहे. ४x४ सिस्टम्स मध्ये लागणारे लो रेंज गिअरिंग, लॉकिंग डिफरेंशियल्स, आणि मजबूत चेसिस – या सर्व गोष्टींचं उत्पादन महाग आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल असतं. परिणामी, या गाड्या स्वस्तात उपलब्ध करणे उत्पादकांसाठी कठीण होतं.
दुसरं कारण म्हणजे ग्राहकांची प्राथमिकता. बहुतांश भारतीय खरेदीदार इंधन कार्यक्षमता, आरामदायक प्रवास, आणि शहरातील सहज चालवण्यावर भर देतात. त्यामुळे उत्पादन कंपन्या आपल्या बजेट SUV मॉडेल्समध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह (FWD) सिस्टम्सच वापरतात.
तिसरं कारण आहे वाढती किंमत. बीएस६ फेज २ उत्सर्जन मानकं, ६ एअरबॅग्ससारखी सेफ्टी वैशिष्ट्यं, आणि वाढलेले कच्च्या मालाचे दर यामुळे अगदी एंट्री-लेव्हल SUV गाड्यांच्याही किंमती वाढल्या आहेत.
₹१० लाखांखाली उत्तम ‘रफ रोड SUV’ पर्याय
जर तुमचं वाहन वापर ग्रामीण रस्ते, खराब डांबरी ट्रॅक, किंवा गावे-शेती यापुरतं असेल, तर खालील SUV हे चांगले पर्याय आहेत:
१. टाटा पंच (₹६.१३ – ₹१०.२० लाख एक्स-शोरूम)
- टफ मायक्रो-SUV: ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित.
- योग्यता: २०० मिमी ग्राउंड क्लीयरन्स (२०२५ अपडेट), मजबूत बॉडी, चांगली वॉटर वेडिंग क्षमता.
- इंजिन: १.२ लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल.
२. महिंद्रा बोलेरो (₹९.७० – ₹१०.९३ लाख एक्स-शोरूम)
- ग्रामीण भारताची शान: सालोंपासून टिकून असलेली आणि ट्रस्टेड SUV.
- योग्यता: बॉडी ऑन फ्रेम, रिअर व्हील ड्राईव्ह, दमदार १.५ लिटर mHawk डिझेल इंजिन. चढणं, शेतीचे रस्ते यासाठी परिपूर्ण.
- वैशिष्ट्य: उच्च ग्राउंड क्लीयरन्स, टिकाऊपणा.
३. रेनॉल्ट काईगर (२०२५ अपडेट – ₹६ ते ₹११ लाख एक्स-शोरूम)
- स्टायलिश SUV: स्पोर्टी लुक्स आणि भरगच्च फिचर्स.
- योग्यता: २२२ मिमी ग्राउंड क्लीयरन्स, चांगली सस्पेन्शन ट्युनिंग, खड्डे व चढ-उतारासाठी आदर्श.
- इंजिन: १.० लिटर नैसर्गिक व टर्बो पेट्रोल पर्याय.
थोडी वाढीव किंमत – पण ‘खऱ्या’ ४x४ गाड्यांच्या जबरदस्त पर्याय
₹१० लाखाच्या थोड्याशा पलिकडे गेल्यावर, भारतीय बाजारात काही प्रामाणिक ४x४ SUV उपलब्ध आहेत:
१. महिंद्रा थार (सुरुवात सुमारे ₹११.५० लाख एक्स-शोरूम)
- आयकॉनिक SUV: थार म्हणजे भारतातल्या ऑफ-रोडिंगचं प्रतीक.
- योग्यता: लो-रेंज ट्रान्सफर केस (मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये), मजबूत लॅडर फ्रेम चेसिस. AX(O) व्हेरिएंटमध्ये ऑप्शनल रिअर लॉकिंग डिफरेंशियल मिळतो.
- इंजिन: २.० लिटर टर्बो पेट्रोल किंवा २.२ लिटर टॉर्की डिझेल.
- महत्त्वाचं वैशिष्ट्य: २२६ मिमी ग्राउंड क्लीयरन्स.
२. मारुती सुझुकी जिम्नी (सुरुवात सुमारे ₹१२.७४ लाख एक्स-शोरूम)
- छोटी पण ताकदवान: जुनी जिप्सी याचा आधुनिक वारसदार.
- योग्यता: AllGrip Pro ४x४ सिस्टम, लो रेंज ट्रान्सफर केस, लॅडर फ्रेम, उत्कृष्ट अॅप्रोच/डिपार्चर अँगल्स.
- इंजिन: १.५ लिटर K-सीरिज पेट्रोल.
- वैशिष्ट्य: २१० मिमी ग्राउंड क्लीयरन्स, ३७-डिग्री अॅप्रोच अँगल.